मुंबई- सध्या कोरोनाच्या काळात आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची नितांत गरज आहे. आपल्या रोजच्या आहारातून आपल्याला अनेक पोषक तत्वे मिळत असतील मात्र या काळात आपल्याला तेवढे पोषक तत्वे पुरेसे नाहीत. त्या बरोबर अनेक प्रकारच्या फळांचाही समावेश आपल्या आहारत करुन घ्यायला हवा.
तज्ञांच्या मते, या काळात व्हिटॅमिन सी आपल्या शरीरासाठी उत्तम आहे. त्याने रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच मात्र आपल्याला अनेक आजारांशी लढा द्यायलासुद्धा मदत करते. त्यामुळे आर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांंचं सगळीकडे वाटप होत असताना त्यासोबतच व्हिटॅमिन-सी च्या गोळ्यांचे देखील वाटप करण्यात आले होते. या सगळ्या गोळ्यांचे सेवन करण्यापेक्षा आपण घरच्या घरीच अनेक पदार्थांचं किंंवा फळांचं सेवन करु शरीरातील व्हिटॅमिन-सीचं प्रमाण वाढवू शकतो.
लिंबू- हा विटामिन सी चा सर्वात मोठा आणि चांगला घटक मानला जातो. याच कारणामुळे बहुतांश लोक जेवनानंतर लिंबू पाण्यात पिळून पितात. विटामिन सी मिळवण्यासाठी तुम्ही लिंबूचा अनेक प्रकारे रोजच्या आहारात समावेश करू शकता. काही लोक लिंबू सरबत करून याचे सेवन करतात. तर काही लोक डाळ-खिचडी मध्ये लिंबाचा रस पिळून जेवणाचा स्वाद वाढवण्यासोबतच विटामिन सी मिळवतात. लिंबू हे स्वस्त आणि नेहमी उपलब्ध असल्याने ते सहज आणि सर्वांना मिळू शकते.
पालक- पालकच्या भाजीमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. पालकच्या भाजीला हिमोग्लोबिन वाढवण्याच्या दृष्टीने एक गुणकारी पालेभाजी मानली जाते.पालकामध्ये या व्यतिरिक्त आणखी विविध औषधी गुण देखील आढळून येतात. पालक भाजीचे वनस्पतिक नाव स्पीनेसिया ओलेरेसिया असे आहे.
संत्री- संत्री हे शरीरासाठी प्रचंड पोषक फळ आहे. संत्रीमध्ये असणारे फोलेट आणि फोलिक एसिडमुळे मेंदूचा विकास होण्यास मदत होते. संत्र्याच्या सेवनाने पचनशक्ती वाढते तसेच उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो संत्रीच्या खाल्ल्याने भूकही वाढण्यास मदत होते. संत्र्याचा ज्युस पिण्यासोबतच तुम्ही संत्र्याची बर्फी, संत्र्याची कॅंडी आणि संत्र्याचा जॅम करूनही खाऊ शकता. संत्री बरोबरच किवी आणि पेरुमध्येही व्हिटॅमिन-सी आढळते.