राजेगाव – येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक शाखा, राजेगाव (ता. दौंड) येथील शाखेला दौंडचे सहायक निबंधक मिलिंद टांकसाळे यांनी अचानक भेट देऊन कर्ज माफीच्या कामाचा आढावा येथील सहकारी संस्थाकडून घेतला. यावेळी या शाखेचे शाखा विकास अधिकारी शिवाजी गरगडे यांनी बॅंकेशी संलग्न असलेल्या सहकारी संस्थाचे चालेल्या कामाचा आढावा यावेळी टांकसाळे यांना दिला.
महाराष्ट्रात कर्ज माफिशी घोषणा झाली आणि विविध बॅंक, सहकारी संस्था यांना कर्ज खातेदाराची माहिती गोळा करून ती वरिष्ठांकडे देण्याची लगबग सुरू झाली, त्यामुळे येथील अधिकारी कर्मचारी या कामात व्यस्त असताना त्यांना काही अडचणी येत नाहीत ना आणि अडचणी असल्यास समजून घेत त्यावर मार्ग काढण्यात आला.
यावेळी टांकसाळे यांनी या शाखेचे शाखा विकास अधिकारी गरगडे व सहकारी संस्थाचे सचिव, कर्मचारी यांनी केलेल्या कामांचा आढावा घेतला व त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक केले.
यावेळी शाखेचे शाखा विकास अधिकारी शिवाजी गरगडे शाखा प्रमुख हनुमंत काजळे, निर्मला खाडे, सचिव छगनराव अडसूळ, सचिव रमेश शिंदे, शरद शेळके, अमित ढवळे, अनिल खैरे, विशाल भोसले, दत्ता ससाणे, रामदास धायतोंडे, दादा शिंदे आदी उपस्थित होते.