पिंपरी(प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहराचे माजी उपमहापौर विष्णू गुलाब कांबळे (वय ७८) यांचे शुक्रवारी (दि. २४) दुपारी प्रदीर्घ आजाराने दुखःद निधन झाले. विष्णू कांबळे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील चौबे पिंपरी येथील रहिवासी होते. नोकरी कामानिमित्त पिंपरी चिचंवड शहरात आले त्यांनी एस. के. एफ. कंपनीमध्ये नोकरी केली.
१९८६ ते ९२ या काळात नगरसेवक पदावर निवडून आले. त्यांना महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार देण्यात आला होता. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिक्षण मंडळाचे सदस्य, गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीचे अध्यक्ष, स्थायी समिती सदस्य अशा पदांवर त्यांनी काम केले. शिवशंकर सेवाभावी चारीटेबल ट्रस्टचे संस्थापक व विजय शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर चे संस्थापक होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, तीन मुली जावई नातवंडे असा परिवार आहे. एनएसयुआयचे (विद्यार्थी काँग्रेस) माजी प्रदेशाध्यक्ष व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मनोज कांबळे यांचे ते वडील होत.