लॉकडाऊनचे पालन करून मुस्लीम धर्मीय घरातच साजरा करणार रमजान

पुणे : मुस्लीम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याला शनिवारपासून सुरूवात झाली आहे. मात्र, शहरात करोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे सामुदायिक नमाज पठण आणि सामुदायिक उपवास सोडण्याला मर्यादा आल्या आहेत. खबरदारी म्हणून एकमेकांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छाही देता येणे शक्य नाही. असे असले, तरी या महिन्याचे पावित्र्य राखत मुस्लीम धर्मिय लॉकडाऊनचे पालन करून घरातच रमजाण साजरा करणार आहेत.

मुस्लीम धर्मीयांमध्ये रमजानला विशेष महत्व आहे. मनातील दरी कमी करून परस्परांमध्ये स्नेहभाव, सद्भाभावना वाढविणारा, संयम, त्याग शांती, आदींची शिकवण देणारा आहे. संपूर्ण महिनाभर अत्यंत कडकडीत रोजे, सहा वेळा नमाज कुराण पठण, आणि अल्लाचे स्मरण केले जाते. मात्र, यावर्षी पवित्र रमजान महिन्यावर करोनाचे संकट आहे.

लॉकडॉऊनचे नियम पाळून रमजाण घरातच साजरा करावा. असे आवाहन विविध संघटनेकडून करण्यात आले. त्याला मुस्लीम धर्मींय नागरिकांनी घरातच नमाज पठण करून साथ दिली. रमजान मध्ये सामूहिक नमाज पठणाला महत्व दिले जाते. शेवटी एकमेकांना अलिंगन दिले जाते. मात्र सध्या रमजानवर करोनाचे सावट आहे. आजच्या परिस्थितीत अशी गोष्टी करणे म्हणजे मानवेतवर संकट ओढवण्यासारखे आहे. सामुहिक पद्धतीने करण्यात येणार्‍या गोष्टी टाळान्याय येणार आहेत.

याबाबत बोलतांना मुस्लीम सत्यशोधन मंडळाचे अध्यक्ष शमशुद्दीन तांबोळी म्हणाले, मुस्लीमांच्या दृष्टीने रमजान महिणा हा अत्यंत पवित्र आहे. कारण या महिण्यातच कुराणचे प्रकटिकरण झाले होते. या महिण्यात मनशुद्धता, संयम समाजात रुजविण्यात येते. सामूहिक पद्धतीने नमाज पठण करण्यात येते. या महिण्यात जन्नतची दारे उघडली जाते. आणि सैतानाला साखळ दंडाने बांधण्यात येत असते. आता करोनाच्या निमित्ताने जो सैतान मोकाट सुटला आहे. धर्म, जात न पाहता मानवतेसमोर मोठ संकट उभ केल आहे.

त्यामुळे सौदी अरेबियातील मक्का मश्जिद सुद्धा बंद आहे. मोहम्मद पैगंबर यांच्या काळातदेखील महामारीने थैमान घातले होते. त्यावेळी मुस्लीम धर्मीयांनी मश्जिद , रस्त्यावर न येता धर्मकर्तव्य घरातच करावे असे आवाहन केले होते. त्या पार्श्वभूमीवर आज मुस्लीम समाजाने विवेक आणि विज्ञानाला सोबत घेऊन रमजान महिणा वरदान ठरेल हे पाहिले पाहिजे. रोजा सोडायला फळ, खजूर पाहिजे असा कुठलाही नियम नाही. यामुळे नागरिकांनी फळांसाठी बाहेर पडू नये. लॉकडाऊन काळात प्रशासनाने ठरवून दिलेले नियम पाळावे असेही तांबोळी यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.