जकार्ता (इंडोनेशिया) – इंडोनेशियामधील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी तब्बल २० देशांमधील पर्यटकांना इंडोनेशियामध्ये व्हिसामुक्त प्रवेश देण्याचा प्रस्ताव आहे. इंडोनेशियामधील पर्यटन आणि सर्जनशील अर्थकारण मंत्रालयाने या आशयाचा प्रस्ताव ठेवला आहे.
स्थानिक सरकारी वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. सध्या ज्या देशांसाठी व्हिसा सवलत अस्तित्वात आहे ते वगळता अन्य २० देशांसाठी व्हिसा मुक्त प्रवेशाची सुविधा देण्यात येणार आहे.
या २० देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, चीन, भारत, दक्षिण कोरिया, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी इत्यादींचा समावेश आहे, असे पर्यटन मंत्री सांदिगा सलाहुद्दीन उनो यांनी राजधानी जकार्तामध्ये सांगितले. अलिकडेच मलेशिया आणि श्रीलंकेनेही पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी काही देशांसाठी व्हिसा मुक्त प्रवेशाची सुविधा सुरू केली आहे.