Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी सोमवारी पार पडेल. यात राज्यातील 13 मतरदार संघाचा समावेश होता. यातील मुंबईमधील काही मतदान केंद्रावर अतिशय संथपणे मतदान होत असल्याची तक्रार करत नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. यावर आता उद्धव ठाकरे तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगासह केंद्र सरकारवर संशय व्यक्त करत आहे उद्धव ठाकरे संताप व्यक्त करत म्हणाले,’निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी मतदार केंद्रात दिरंगाई करताय. नावे दोनदा तपासली जातायत. ज्येष्ठ मतदारांना त्रास होतोय. कसलीही सोय करण्यात आली नाही आहे. त्यामुळे निवडणूक आयोग पक्षपातीपणा करतोय, असा आरोप ठाकरेंनी केला होता. मोदी सरकार पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर घरगाड्या सारखा करतोय. पक्षपातीपणा करतोय’ असा आरोपही त्यांनी लगावला यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले,’मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. पण आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ केले आहे. 4 जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करीत आहेत. शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत’ असेही ते म्हणाले.