Tejashwi Yadav on Chhapra Firing । बिहारच्या छपरामध्ये आज सकाळी झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. तर या घटनेत दोघे जण गंभीर जखमी झाले. या संपूर्ण घटनेवरून आता राजकारण सुरू झाले आहे. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी या घटनेबाबत मोठे वक्तव्य केलंय. पाटण्यात पत्रकारांशी संवाद साधताना तेजस्वी यादव यांनी भाजपवर निशाणा साधला.
निवडणुकीत हिंसाचाराला थारा नको Tejashwi Yadav on Chhapra Firing ।
तेजस्वी यादव यांनी म्हणाले की, “निवडणुकीत हिंसाचाराला थारा नसावा. आम्ही प्रशासनातील लोकांशीही बोललो आहोत. आज सकाळी घडलेल्या या घटनेनंतर दोघांना अटक करण्यात आल्याची चर्चा आहे. दोन जण फरार आहेत. उर्वरित दोन जणांनाही सायंकाळपर्यंत पकडले जातील” आश्वासन प्रशासनाने दिले आहे. भाजपवर हल्लाबोल करताना त्यांनी,”पराभवाच्या भीतीने असे काही लोक करतात” असे म्हटले आहे.
रोहिणी आचार्य यांच्या विरोधाबद्दल काय म्हणाले? Tejashwi Yadav on Chhapra Firing ।
दरम्यान, काल रोहिणी आचार्य छपरा येथे ज्या बूथवर गेल्या होत्या, त्या बूथवरून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये भाजप कार्यकर्ते किंवा समर्थक हुल्लडबाजी करत असल्याचे दिसत आहे. या प्रश्नावर तेजस्वी यादव म्हणाले की, “जेव्हा आम्ही चेचरला गेलो होतो तेव्हा तिथेही लोक ओरडत होते. त्याचा अर्थ तुम्ही समजू शकता. भाजप नर्व्हस आहे का, या प्रश्नावर? त्यावर ते म्हणाले, जनता स्पष्टपणे भाजपला न्याय देत आहे.”
मंगळवारी सकाळी छपरा येथे दोन गट एकमेकांशी भिडले. निवडणुकीच्या वादातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. छपरामध्ये पोलीस हाय अलर्टवर आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप देण्यात आले आहे. गेल्या सोमवारी येथे पाचव्या टप्प्यांतर्गत मतदान झाले. दुसऱ्या दिवशीही अशीच घटना घडली.
हेही वाचा
बिहारच्या सारणमध्ये मतदानानंतर हिंसाचार, गोळीबारात एक ठार, दोन जखमी, ४८ तास ‘इंटरनेट बंद’