World Cup 2023 Final : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (India vs Australia Ahmedabad)तब्बल सव्वा लाख क्रिकेटप्रेमींनी गर्दी केली होती. सामना सुरू होण्यापूर्वी तमाम देशवासियांना भारताच्या विजेतेपदाची उत्कंठा लागली होती.
एकेक फलंदाज बाद होत गेले व भारताची धावसंख्या ऑस्ट्रेलियाने रोखली (India vs Australia). या धावांचा पाठलाग करताना ट्रेव्हीस हेडने शतक तर मार्नस लेबुशेनने अर्धशतक फटकावले व विजय खेचून आणला व त्याच क्षणी केवळ मैदानात उपस्थित असलेल्यांचीच नव्हे तर संपूर्ण देशवासियांची निराशाच झाली.
2003 सालच्या स्पर्धेचीच जणू पुनरावृत्ती ऑस्ट्रेलियाने केली असेच आता म्हणावले लागेल. त्यावेळीही भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते व ऑस्ट्रेलियाने करंडक उंचावला होता. यावेळीही तेच घडले.
ऑस्ट्रेलियाने पराभव केल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा अश्रू अनावर झाल्याने मैदानाच्या बाहेर निघून गेला. भारताच्या सर्व खेळाडूंना अश्रू अनावर झाले. यावेळी विराट कोहली (Virat-Anushka) भावनिक झाला होता. त्याला पत्नी अनुष्काने मिठी मारत सावरण्याचा प्रयत्न केला.
विराट-अनुष्काचा (Virat-Anushka) एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये विराट कोहलीला (Virat-Anushka) अश्रू अनावर झाले असून, तो पत्नी अनुष्का शर्माला मिठी मारत असल्याचं दिसत आहे.
विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेट्सने पराभव केला. भारताचे स्वप्नभंग करत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. टीम इंडियाचे 241 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने सहजरित्या गाठले.