हॉंगकॉंग – जगभरात करोना आणि ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे नेतेमंडळी किंवा अधिकरी कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवताना दिसत आहे. यावेळी करोनाच्या नियमांचे देखील सर्रास उल्लंघन होताना दिसून येते. अशात हॉंगकॉंगमधील एका घटनेचे मात्र कौतुक होत आहे.
लोकांवर बंधनं घातली जात असताना काही अधिकारी एका वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाले म्हणून अधिकाऱ्यांना सरळ क्वारंटाईनमध्ये पाठविण्यात आले आहे. हॉंगकॉंगच्या सरकारने आपल्या गृह सचिवासह 10 वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना पार्टीत उपस्थित राहिल्याबद्दल फटकारले. याबाबत हॉंगकॉंगमधील मुख्य कार्यकारी अधिकारी कॅरी लॅम म्हणाले, या घटनेने मी अत्यंत नाराज आहे. काही अधिकारी सोमवारी रात्री एका पार्टीत सहभागी झाले होते. ज्यांच्यापैकी काहींची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली.
आपल्याकडे राज्यात आणि देशात करोनाचे आकडे महाभयंकर पद्धतीने समोर येत असताना देखील राजकीय मंडळी त्यांचे कार्यक्रम घेत आहेत. मोठ्या रॅली, लग्नाच्या कार्यक्रमांना नियमांचे उल्लंघन करत लोकांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती दिसून आली आहे. ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.