नवी दिल्ली -भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिला हंगेरीचा व्हिसा वेळेत न मिळाल्यामुळे परदेशात सरावासाठी जाण्यासाठी तिला आता प्रतीक्षा करावी लागणार आहे. भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालयल तिच्या मदतीला सरसावले असले तरीही यातून मार्ग काढण्यासाठी अद्याप दोन ते तीन दिवस लागतील असे सांगण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात विनेशसह साक्षी मलिक व बजरंग पुनिया यांच्याबरोबर अनेक कुस्तीपटू जंतर मंतरवर आंदोलनाला बसले होते. केंद्रीय क्रीडामंत्रालयाने न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यावर या कुस्तीपटूंनी आंदोलन स्थगित केले. तसेच त्यांनी आगामी आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच पुढील वर्षीचे पॅरिस ऑलिम्पिक समोर येवत परदेशात सरावाची परवानगी मागितली होती, ती मान्यही करण्यात आली होती.
कझाकीस्तानमध्ये प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी विनेश गेल्या आठवड्यातच रवाना होणार होती, मात्र, तिचा पासपोर्ट हंगेरीच्या दुतावासात अडकल्याने तीला जाता आले नाही. तसेच हंगेरीकडूनही तीचा व्हीसा अद्याप मिळाला नसल्याने तिला प्रतीक्षा करावी लागत आहे.
या कालावधीत 2 ते 10 जुलै या दरम्यान होत असलेल्या या शिबिराला तीला मुकावे लागणार असल्याचेच समोर येत आहे. मात्र, त्यानंतर 10 जुले ते 18 जुलै या कालावधीत बुडापेस्टमधील शिबिरात तीला सहभागी होता येइल असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे, तो पर्यंत तिचा हंगेरीचा व्हिसा मंजूर होइल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.
महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण यांनी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत हे सगळे कुस्तीपटू आंदोलनाला बसले होते. तब्बल एक महिन्यानंतर केंद्रीय क्रीडामंत्रालयाच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन स्थिगत करण्यात आले व खेळाडूंचा सराव पुन्हा एकदा सुरू झाला. त्यातच त्यांनी परदेशात सरावासाठी पाठवण्याची केलेली मागणीही मान्य केली गेली. व्हिसा मिळाल्यावर विनेश फिजिओ अश्विनी जीवन, सहकारी खेळाडू संगीता फोगट आणि प्रशिक्षक सुदेश यांच्यासोबत रवाना होणार आहे.
साक्षी व बजरंगचा सरावाला प्रारंभ
विनेशला जरी व्हिसा मिळाला नसला तरी साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांना व्हिसा मिळाल्याने ते कझाकिस्तानला दाखल झाले असून त्यांनी सरावही सुरू केला आहे. बजरंगसह फिजिओ अनुज गुप्ता, सहकारी जितेंद्र किन्हा तसेच अन्य सपोर्ट स्टाफही तेथे दाखल झाला आहे. साक्षीसह तिचे पती सत्यव्रत कादियानही आहेत.