भुवनेश्वर – ओडिशामधील एका आदिवासी महिलेने केवळ 800 रुपयांना आपले 9 महिन्यांचे तान्हे मूल विकल्याचा धक्कादायक प्रकार उगडकीस आला आहे. ओडिशामधील मयूरभंज जिल्ह्यातल्या माहुलिया गावातील या महिलेने आपली मुलगी बिपारचरणपूर गावातील एका दाम्प्÷याला महिन्याभरापूर्वी विकले.
या महिलेचा पती तामिळनाडूला गेला असताना या महिलेने परस्पर आपली मुलगी विकून टाकल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या महिलेचा पती तामिळनाडूवरून परत आल्यावर त्याला हा प्रकार समजला. त्याने आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली. बेपत्ता झालेल्या मुलीच्या तपासादरम्यान महिलेने आपली मुलगी विकून टाकल्याचे मान्य केले.
मुलीचा सांभाळ करणे अवघड जात असल्याने मुलगी विकून टाकण्याचा निर्णय आपण घेतल्याचे तिने सांगितले. आपल्याला अपत्य नसल्यामुळे आपण ही मुलगी खरेदी केल्याचे मुलीची खरेदी करणाऱ्या दाम्पत्याने सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी मुलीची आई, खरेदी करणारे दाम्प्÷य आणि एक मध्यस्थ अशा चार जणांना अटक केली आहे. विक्री झालेल्या मुलीची सुटका करण्यात आली असून तिला बाल कल्याण कमिटीच्या सदस्यांच्या उपस्थितीत तिच्या आजीच्या ताब्यात देण्यात आले आहे.