नवी दिल्ली – ज्येष्ठ कुस्तीपटू विनेश फोगटने तिचा खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत केला आहे. तिने २६ नोव्हेंबर रोजी पुरस्कार परत करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार तिने शनिवारी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार पंतप्रधान कार्यालयाबाहेर कर्तव्य पथावर ठेवले आहेत. तो नंतर पोलिसांनी उचलला. कुस्तीपटू बजरंग पुनियाने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.
भारतीय कुस्ती संघटनेची निवडणूक २१ डिसेंबर रोजी पार पडली. यामध्ये संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर साक्षी मलिकने कुस्तीतून संन्यास, तर बजरंगने पद्मश्री परत केला होता. आता विनेशने तिचा खेलरत्न परत केला आहे. पॅरा अॅथलीट वीरेंद्र सिंहनेही आपला पद्मश्री परत करण्याबाबत सांगितलेले आहे.
विनेशची कामगिरी
– २०२२च्या जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक
– २०१९ च्या जागतिक स्पर्धेत कांस्यपदक
– २०१८ साली आशियाई खेळ, राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक
– २०१४, २०१८ आणि २०२२ राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक
– प्रतिष्ठित लॉरियस पुरस्कारासाठी नामांकन मिळालेली पहिली भारतीय खेळाडू