नवी दिल्ली : निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणात न्यायालयाने डेथ वॉरंट बजावलेल्या आरोपींपैकी विनयकुमार शर्मा याने गुरूवारी पोलिसांत सुधारीत याचिका दाखल केली.
दिल्ली न्यायालयाने मंगळवारी मुकेश(32), पवन गुप्ता (25), विनय शर्मा (26), आणि अक्षयकुमार सिमग यांच्या विरोधात 22 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता तिहार तुरूंगात फाशी देण्याचे डेथ वॉरंट काढले आहे.
याचिकाकर्त्यांचा सामाजिक आर्थिक स्तर पहावा, त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या आजारी आई वडिलांसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या संख्येचा विचार करावा, त्याच्या पुनर्वसनाचा पुरेसा विचार न करणे हे न्यायाची हत्या केल्या सारखे होईल, असे या याचिकेत म्हटले आहे.
समाजाचा सामुहिक विवेक आणि जनतेच्या मतांचा प्रभाव या निकालावर पडला आहे. नकळत दिलेल्या वाईट निर्णय बदलून शिक्षा सर्वोच्च न्यायलयात परावर्तीत केल्या आहेत. त्यानुसार ही फाशीची शिक्षा जन्मठेपेत परावर्तीत करावी, असे या याचिकेत म्हटले आहे.