पुणे – एरंडवणा अग्निशमन केंद्राच्या बाहेरील भिंतीवर अग्निशमनचे कार्य करणारी आकर्षक चित्रे रेखाटली आहेत. ही चित्रे अग्निशमन केंद्रातील इतिहासाला उजाळा देत असून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. शहरात स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत स्वच्छता व सुशोभीकरण केले जात आहे.
यामध्ये, एरंडवणा अग्निशमन केंद्राच्या बाहेर अनोखी चित्रे नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरताना दिसत आहेत. या चित्रांमुळे परिसराला चकाकी आली आहे. या चित्रामध्ये अग्निशमन केंद्राच्या संग्रहात असलेला 1,953 सालचा आगीचा बंब, आग विझविण्याचे प्रात्यक्षिक दाखविणारा जवान, देवदूत गाडी, उंच इमारती, आगीतून बाळाला वाचविणारा अग्निशमनचा जवान अशा प्रकारच्या सुंदर संकल्पनेतून चित्रे साकारण्यात आली आहेत.