लोणावळा परिसरातील गावांना आता “ग्रामसुरक्षा’ कवच

Madhuvan

  • गाव सुरक्षिततेसाठी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर करण्याचे संचालक गोर्डे यांचे आवाहन

कार्ला – गावांना व गावातील प्रत्येक नागरिकांला सुरक्षित करण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर करा, असे आवाहन ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोर्डे यांनी लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील सर्व ग्रामपंचायतींना केले आहे.

गाव परिसरात होणाऱ्या चोऱ्या, दरोडे, महिलांसंदर्भातील गुन्हे, लहान मुले बेपत्ता होणे, वाहनचोरी, गंभीर अपघात, वन्य प्राण्यांचा हल्ला, आग अथवा जळिताच्या घटना यासह कोणतीही दुर्घटना व गावातील महत्त्वाचे संदेश गावातील सर्व नागरिक व सोबतच परिसरातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी, सरकारी यंत्रणा यांना त्यांच्या मोबाइलवर या यंत्रणेत सहभागी झाल्यानंतर एकाच वेळी संदेश देणाऱ्या व्यक्‍तीकडून जाणार असल्याने यामुळे गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे.

नाशिक जिल्ह्यात ही यंत्रणा यशस्वीपणाने राबविल्यानंतर आता पुणे जिल्ह्यात ती कार्यान्वित करण्यात आली आहे. शिरूर, दौंड या तालुक्‍यांमधील गुन्हेगारी रोखण्यात या यंत्रणेला मोठे यश मिळाले आहे. पुणे ग्रामीणचे नवनियुक्‍त पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण व लोणावळा शहर पोलीस ठाणे हद्दीतील गावांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.

वरसोली येथील सुमंत पॅलेस येथे याची माहिती देण्यात आली. लोणावळा शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व गावांचे सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, ग्राम सुरक्षा दलाचे प्रमुख, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांची बैठक पार पडली. या वेळी ग्रामसुरक्षा समितीचे संचालक डी. के.गोर्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी, निरंजन रणावरे, पोलीस उपनिरीक्षक बळीराम सांगळे, प्रियंका माने व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

आजपर्यत 1200 गावे यामध्ये सहभागी झाली असून, 5 लाखांहून अधिक तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत. गावातील प्रत्येक नागरिकाने या यंत्रणेत आपला नंबर समाविष्ट करून घ्यावा. या व्यतिरिक्त गावातील महत्त्वाचे संदेश ग्रामस्थांपर्यंत पोहचविण्याचे काम देखील या यंत्रणेतून होणार आहे. ग्रामसभेची सूचना, रेशनिंग बाबतची माहिती व अन्य महत्त्वाच्या सूचना यामधून देता येतील. मात्र संदेश देताना संदेश देणाऱ्याने स्वतःचे नाव, ठिकाण व संदेश स्पष्ट शब्दांत द्यायचा आहे.

या यंत्रणा ही स्वंयचलित असल्याने येणारा प्रत्येक कॉलची पडताळणी करून तो संदेश पुढे जसाच्या तसा पोहचविला जातो. फेक मेसेज यावर कोणी पाठविल्यास

या वेळी मार्गदर्शन करताना गोर्डे म्हणाले की, ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर हा प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये वायरलेसप्रमाणे काम करणार आहे. संपूर्ण देशामध्ये 1800 270 3600 हा टोल फ्री क्रमांक असून, यावर फोनकरून आपण आपत्तीजन्य परिस्थिती तो पडताळण्याची यंत्रणा यामध्ये असल्याने असे संदेश पुढे जात नाही. आपल्या गावांमधील गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी व गावांना सुरक्षित करण्यासाठी सर्व गावांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन या यंत्रणेचे संचालक डी. के. गोर्डे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी केले आहे.

गावांमध्ये चोऱ्या, दरोडे, महिला संदर्भात होणारे गुन्हे, वाहन चोरी, आग लागणे अशा घटना घडत असतात. ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर केल्यास निश्‍चितच या घटना रोखता येतील. गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यास ही यंत्रणा निश्‍चितच उपयोगी ठरेल. ग्रामसुरक्षा यंत्रणा ही सर्वोत्तम यंत्रणा आहे. जी गावे सुरक्षित करण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे, यामुळे गावे सुरक्षित होतील, गुन्हेगारीला आळा बसेल.
– अनंता हनुमंत शिंदे, पोलीस पाटील, देवघर.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.