सातारा – सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे माजी सहकारमंत्री व कराड दक्षिण मतदारसंघाचे पस्तीस वर्ष प्रतिनिधित्व केलेले विलासराव (काका) पाटील – उंडाळकर (वय ८४) यांचे सातारा येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण जिल्ह्यावर दुःखाचे सावट पसरले आहे .
मूळचे उंडाळे (तालुका कराड) गावचे रहिवासी असलेल्या विलासराव पाटील उंडाळकर यांनी 1967 मध्ये राजकारणात प्रवेश केला होता. सातारा जिल्हा बँकेत संचालक म्हणून प्रवेश केल्यानंतर गेली पाच दशके ते जिल्हा बँकेवर संचालक म्हणून कार्यरत होते.
त्यानंतर त्यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सलग 35 वर्ष त्यांनी काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले होते. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर सातारा जिल्ह्यात एकमेव कराड दक्षिण विधानसभा मतदा संघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून विलासराव पाटील-उंडाळकर यांनी अबाधित ठेवला होता.
मागील काही दिवसांपासून विलासराव पाटील-उंडाळकर यांचे प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर सातारा येथे उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.