मेष : फायदा मिळवून देणारी कामे हाती घ्याल. वरिष्ठ व सहकाऱ्यांची मर्जी राहील. वातावरण आनंदी राहील.
वृषभ : नवीन कामाची जबाबदारी तुमचेवर येईल. मधूनच कामाचा मनस्वी कंटाळा येईल.
मिथुन : नोकरीत कामाची जबाबदारी वाढेल. आवडीच्या कामातून स्वतःचे अस्तित्व सिद्ध करून दाखवाल.
कर्क : नोकरीत वरिष्ठांना खुष करण्यासाठी जादा कामाची तयारी असेल. शुभसमारंभामुळे पैशाची तंगी जाणवेल.
सिंह : वरिष्ठांनी दिलेली ओशासने जरी पूर्ण झाली नाहीत तरी रागावू नका. बोलण्यावर संयम ठेवा.
कन्या : लाभ कसा उठवायचा हे सर्वस्वी तुमच्याच हातात आहे. घरात एखाद्या सदस्यांचा प्रश्न हलका होईल.
तूळ : विरोध होण्याची शक्यता राहील.तडजोड केल्यास लाभ तुमचाच होईल. कुटुंबासमवेत प्रवास योग संभवतो.
वृश्चिक : वरिष्ठांच्या अपेक्षा वाढल्याने कामाचा मनस्वी कंटाळा येईल. त्यामुळे मधूनच मन बंड करून उठेल.
धनु : घरात वातावरण प्रसन्न राहील. विवाहोत्सुक तरुणांना मनपसंत जीवनसाथी निवडता येईल.
मकर : मनाविरुद्ध काम करावे लागेल. घरात आवश्यक कारणांसाठी खरेदी होईल. मुलांकडून यश कळेल.
कुंभ : वरिष्ठांचा मूड बघून तुमच्या मागण्या मान्य करून घ्या. नवीन नोकरीच्या फंदात तूर्तास पडू नका.
मीन : कलाकार, खेळाडूंना त्यांच्या क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. हिरीरीने पुढाकार घेऊन महिला कामे यशस्वी करतील.