मुंबई – बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि सैफ अली खान स्टारर ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हृतिक आणि सैफचा फर्स्ट लूक आल्यापासून, 2017 तमिळ चित्रपट विक्रम वेधाच्या अधिकृत हिंदी रिमेकमध्ये हृतिक रोशन आणि सैफ अली खान, आर माधवन आणि विजय सेतुपती यांच्या जागी पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. हृतिक-सैफची जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ लक्षात घेऊन निर्मात्यांनी आज म्हणजेच बुधवारी त्याचा टीझर रिलीज केला आहे.
उत्तर प्रदेशच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या या चित्रपटात हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा दमदार अभिनय पाहायला मिळत आहे. हृतिक कुर्ता आणि सन ग्लासेसमध्ये खलनायकाच्या भूमिकेत धुमाकूळ घालत असताना, पोलिसांच्या अवतारातील सैफचा इंटेन्स लुकही जबरदस्त आहे. चित्रपटात हृतिक चोर आणि सैफ अली खान पोलिसांच्या भूमिकेत आहेत. टीझरचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते, जिथे चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती.