मुंबई – अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. विक्की आणि साराची धमाल प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे, याचा पुरावा म्हणजे चित्रपटाचे सतत वाढत जाणारे कलेक्शन. शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून तीन दिवसांत चित्रपटाचे कलेक्शन उत्कृष्ट झाले आहे. या चित्रपटाने निम्म्याहून अधिक बजेट काढले आहे. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे.
विक्की कौशल आणि साराचा हा चित्रपट शुक्रवारी 2 जून रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने पहिल्याच दिवशी 5.49 कोटी आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 7.20 कोटी असून, चित्रपटाने आतापर्यंत 21.19 कोटींची तगडी कमाई केली आहे. ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाचे बजेट 40 कोटींच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे.
सारा अली खान आणि विक्की कौशलचा हा पहिला चित्रपट आहे, ज्यामध्ये दोघे मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले आहेत. चित्रपटात या दोन स्टार्सशिवाय नीरज सूद, राकेश बेदी आणि शरीब हाश्मी सहाय्यक भूमिकेत आहेत. सध्या सगळीकडेच याच चित्रपटाचा बोलबाला असून, सोशल मीडियावर देखील चित्रपटातील गाणी चर्चेत आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, नुकतंच चित्रपटातील मुख्य कलाकार सारा आणि विक्की कौशल यांनी मुंबईतील प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे. विक्की आणि सारा यांनी आज सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. सारानं तिच्या सोशल मीडियावर दर्शनाचे फोटो शेअर केले आहेत.
यावेळी सारा अली खान पांढरा ड्रेस परिधान करू आली होती. तर विक्कीनं देखील पांढरा सदरा परिधान केला होता. यावेळी सारा आणि विक्की सिद्धिविनायक मंदिरात दाखल होताच चाहत्यांनी त्यांना पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. दरम्यान, सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर सिद्धिविनायक मंदिर स्ट्रस्टकडून त्यांचं आदरतिर्थ्य करण्यात आलं.