नवी दिल्ली – दिल्लीच्या ईशान्य भागात गेले दोन- तीन दिवस उफाळलेल्या हिंसाचारात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, काही नागरिकांना यात आपला जीव देखील गमवावा लागला आहे. या घटनेवर अनेक राजकीय, क्रीडा आणि बॉलिवूड क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येत आहे.
दरम्यान, या सर्व घटनेवर आंतरराष्ट्रीय बॉक्सर ‘विजेंदर सिंह’ याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीयमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. मात्र, त्याच्या या टीकेला बॉलिवूड अभिनेते ‘परेश रावल’ यांनी चांगेलच प्रत्युत्तर दिले आहे.
जनाब आपको बोकसिंग और बकवास का फ़र्क़ समझ लेना चाहिये ! https://t.co/jh9SkSQMTN
— Paresh Rawal (@SirPareshRawal) February 28, 2020
विजेंदर आपल्या ट्विटमध्ये म्हणाला कि, “संपूर्ण देशाला गुजरात बनवून टाकतील… अजुनही वेळ गेली नाही”. विजेंदरची ही टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर होती.
बॉक्सिंग तों आती है sir बकवास आजकल 2 लोगो से सिख रहा हूँ #Respect https://t.co/v5D6vhLkIT
— Vijender Singh (@boxervijender) February 28, 2020
दरम्यान, विजेंदरच्या ट्विटला रिट्विट करत ‘परेश रावल’ म्हणाले की, “तुम्हाला बॉक्सिंग आणि वायफळ बडबड… यातील फरक समजायला हवा”. यावर विजेंदरने पुन्हा प्रत्युत्तर दिले. त्यामुळे या दोघांमधील हा वाद कितपत वाढत जाईल हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.
दोस्तो ये झूट बोल कर सत्ता में आ तो गये अब इन से संभल नही रही है #DelhiRiots
— Vijender Singh (@boxervijender) February 25, 2020