मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे शनिवारी सेवा निवृत्त झाले. त्यांच्या जागी परमबीर सिंह संजय यांची वर्णी लागली आहे. शनिवारी संजय बर्वे सेवा निवृत्त झाले असून त्यांना मुंबई पोलिसांतर्फे नायगाव मैदानात गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. दरम्यान संजय बर्वे यांना वाढीव मुदत मिळणार नाही असं शुक्रवारी राज्यसरकाने सांगितले होतं. परमबीर सिंह यांनी या अगोदर ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणूनही काम पहिले आहे.