नवी दिल्ली – दिल्ली सरकारने देशद्रोहाच्या प्रकरणात जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातील छात्र संघाचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार आणि अन्य दोघांविरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्यासाठी दिल्ली पोलिसांना मंजुरी दिली आहे. पोलिसांनी 2016च्या या प्रकरणात कुमारसह जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालीद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपींनी 9 फेब्रुवारी 2016 रोजी जेएनयू परिसरात रॅली काढली होती आणि त्या रॅलीमध्ये देशविरोधी घोषणा देत समर्थन केले होते.
JNU sedition matter: Prosecution Department of Delhi government has given its approval for a trial in the matter. Former JNU Students Union President Kanhaiya Kumar and others are involved in the matter. pic.twitter.com/A9OGNwKTSj
— ANI (@ANI) February 28, 2020
काय म्हणाले दिल्ली पोलीस
आरोपींनी 9 फेब्रुवारी 2016 ला JNU परिसरात एका कार्यक्रमादरम्यान मोर्चा काढला होता. त्यावेळी तिथं देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणांचं कन्हैय्या कुमार आणि इतर आरोपींनी समर्थन केलं होतं,’ असं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे.