Lok sabha election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी, भाजपाची घोडदौड महाराष्ट्रच रोखेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिला टप्पात येत्या 19 एप्रिलला मतदान होणार आहे. या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया या पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश असून या पाचही जागांवर काँग्रेस विजयी होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच, भाजपाची घोडदौड महाराष्ट्रच रोखेल, असा दावाही त्यांनी केला आहे.
या लोकसभा निवडणुकीत भाजपाची दमछाक झाल्याचे पाहायला मिळणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदारसंघात उमेदवारी जाहीर करताना भाजपाला घाम फुटला आहे. काही ठिकाणी भाजपा दुसऱ्यांचे उमेदवार पळवत आहे, अशी टीका वडेट्टीवारांनी केली. | vijay wadettiwar on bjp
तसेच काही असे उमेदवार आहेत, ते इच्छुक नसतानाही त्यांना जबरदस्तीने तिकीट देण्यात आले आहे, असे सांगत वडेट्टीवार यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला आहे. तिकीट जाहीर होण्यापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी, आपण राज्यातच राहण्यास इच्छुक असून लोकसभा निवडणूक लढविण्यास आपला रस नसल्याचे म्हटले होते. | vijay wadettiwar on bjp