Vijay Shivtare Baramati Lok Sabha : बारामती लोकसभा मतदार संघामध्ये तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्या लढाईतीत आता विजय शिवतारे यांनी देखील शड्डू ठोकल्याने बारामती मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. अशात आता शिवतारे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आपल्याला लढू द्यावे यासाठी पत्रकार परिषदेद्वारे आपले म्हणणे मांडले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका देखील केली.
गेल्या काही दिवसांपासून शिवतारे यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात तसेच सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामतीतून लढण्याबाबत तयारी सुरु केल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली होती. अशात शिवतारे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात होती. अशात शिवतारे यांनी आपण अपक्ष मैदानात उतरणार असल्याचे जाहीर केले. | Vijay Shivtare Baramati Lok Sabha
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हात जोडून बारामतीची निवडणूक लढवू देण्याची विंनती विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच ‘हा विंचू अनेकांना डसला अन् महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसला’ अशा मार्मिक शब्दात शिवतारेंनी यावेळी अजित पवारांवर टीका देखील केली.
शिवतारे यावेळी म्हणाले,“लोकसभेसाठी आता लोक सांगत आहेत की माघार घेऊ नका. लोक मला कानात सांगतात ही त्यांची भीती आहे. यामुळे आता पर्याय हवा आहे. मतदार संघातून पवार रुपी हुकुमशाही संपवण्यासाठी आता माझे धर्मयुद्ध आहे.” | Vijay Shivtare Baramati Lok Sabha
या तारखेला भरणार फॉर्म
बारामतीमध्ये अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा शिवतारे यांनी जाहीर केली आहे. इतकेच काय तर निवडणूक अर्ज कधी भरणार याबाबत देखील त्यांनी माहिती दिली आहे. १२ एप्रिलला १२ वाजता लोकसभेचा अपक्ष अर्ज भरणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना जाहीर केले. | Vijay Shivtare Baramati Lok Sabha