Mahadev jankar In Mahayuti : महाविकास आघाडीने आपल्याला लोकसभेची उमेदवारी दिल्यास आपण माढा या मतदार संघातून अडीच लाख मतांच्या फरकाने विजयी होऊ असा विश्वास गेल्या काही दिवसांपूर्वी महादेव जानकर यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे जानकर हे महाविकास आघाडीत जातील अशी चर्चा सुरु होती. मात्र आज अचानक त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी हजेरी लावत महायुतीत जाणार असल्याचे स्पष्ट केले.
जानकर महायुतीत जाणार असल्यामुळे आता महाविकास आघाडीचं टेन्शन वाढणार आहे. बारामतीसह माढा मतदार संघावर जानकर यांचा प्रभाव असल्याने त्याचा थेट फायदा महायुतीला होणार आहे. | Mahadev jankar In Mahayuti
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. यावेळी जागावाटपावर झालेल्या चर्चेत जानकर यांना लोकसभेसाठी एक जागा सोडली जाणार असल्याचे समजते. | Mahadev jankar In Mahayuti
वर्षावरील बैठक पार पडताच जानकर आणि खासदार सुनील तटकरे बाहेर आले आणि त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण पूर्ण शक्तिनिशी सोबत राहू, असं महादेव जानकर यांनी यावेळी सांगितले. जानकर यांना परभणी मतदार संघाची जागा दिली जाणार असल्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. | Mahadev jankar In Mahayuti
“विंचू अनेकांना डसला अन् महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसला” शिवतारेंचा अजित पवारांवर निशाणा..