नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांडाचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एकदा देशाला हादरवणारी घटना समोर आली आहे. देशाची राजधानी दिल्लीत एका १२ वीत शिकणाऱ्या मुलीच्या चेहऱ्यावर अॅसिड हल्ला करण्यात आला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत मुलीच्या चेहऱ्याला गंभीर इजा झाल्याचे सांगितले जात असून, तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिल्लीतील द्वारकामध्ये १२ वीत शिकणाऱ्या मुलीच्या चेहऱ्यावर अॅसिड हल्ला केला. दिल्ली पोलिसांना सकाळी ९ वाजता मोहन गार्डनजवळ विद्यार्थिनीवर अॅसिड हल्लाची माहिती मिळाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे वय १७ वर्षे आहे. ती तिच्या लहान बहिणीसोबत उभी होती. त्यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी तिच्यावर अॅसिड हल्ला केला. मुलीने दोन मुलांवर संशय व्यक्त केला आहे. त्यातील एका संशयिताला याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
देश की राजधानी में दिन दहाड़े एक स्कूली बच्ची पर 2 बदमाश दबंगई से तेज़ाब फेंककर निकल जाते हैं… क्या किसी को भी अब क़ानून का डर है ? क्यों तेज़ाब पर बैन नहीं लगाया जाता ? SHAME pic.twitter.com/kaWWQYey7A
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) December 14, 2022
दिल्लीतील या घटनेनंतर नागरिकांमध्ये या घटनेमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्लेखोर आणि पीडित मुलगी एकमेकांना ओळखत होते असे सांगितले जात असून, जखमी मुलीला सफदरजंग रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. पीडितेवर हा हल्ला नेमका का करण्यात आला याचे कारण अद्याप समजू शकलेले नसून, दिल्ली पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.