लखनऊ – फिरोजाबाद जिल्ह्यातील आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर बुधवारी पहाटे एक भीषण अपघात झाला. ठाणे नागला खंगार भागात एक्स्प्रेस वेच्या ६१.२०० किलोमीटरच्या माईलस्टोनजवळ बस डीसीएमला धडकली.
या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर 22 प्रवासी जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. नऊ जखमींना शिकोहाबादच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे, या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
एक स्लीपर बस लुधियानाहून रायबरेलीला जात होती. बसमध्ये सुमारे 60 प्रवासी होते. बुधवारी पहाटे नागला खंगार परिसरात एक्सप्रेस वेवर बस पुढे चालणाऱ्या डीसीएमला धडकली. यानंतर बस रेलिंग तोडून एक्स्प्रेस वेवरून खाली उतरून खड्ड्यात गेली. बस आणि डीसीएमची धडक झाल्यानंतर मोठा आवाज झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.