यंदा मिळाले अवघे 12 दिवस!

पिंपरी – विधानसभा निवडणुकीत मागील दहा दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात सर्वच राजकीय पक्ष तसेच अपक्ष उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. आज शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. त्यामुळे, सकाळपासून अनेक उमेदवारांनी शक्‍तीप्रदर्शन करण्याची तयारी केली असून त्यानंतर प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.

राज्यात सोमवारी मतदान होणार आहे. त्यासाठी 27 सप्टेंबरपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. अर्ज भरल्यानंतर माघार उमेदवारांनी माघार घेण्याच्या दुसऱ्या दिवसापासून प्रचाराला सुरूवात झाली. यंदा प्रचारासाठी अवघे बारा दिवस होते. त्यामुळे कार्यकर्त्यांसह उमेदवारांचीही दमछाक झाली. कमी कालावधीमध्ये प्रत्येक मतदारापर्यंत पोहचणे आवश्‍यक होते. त्यासाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनीही कंबर कसली.

मतदानाच्या 48 तासापूर्वी कोणत्याही जाहीर प्रचारास प्रतिबंध आहे. त्यामुळे शहरातील तीनही मतदारसंघातील प्रचार आज सायंकाळी पाच वाजता संपणार आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात कोपरा सभा, बैठका, पदयात्रा यामुळे शहरामध्ये प्रचाराचा धुराळा उडाला होता. वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप, टीकाटिपण्णी या भोवतीच प्रचार फिरत होता. याशिवाय उमेदवारांनी गाठीभेटींवरही भर दिला होता.

शेवटच्या दिवशी उडणार धांदल – प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने शेवटच्या मतदारापर्यंत पोहचण्यासाठी उमेदवार व कार्यकर्ते यांची चांगलीच धांदल उडणार आहे. शनिवारी बहुतेक आयटीयन्स कामगारांना सुट्टी असल्याने हा मतदार वर्ग उमेदवारांनी प्रचारासाठी राखून ठेवला होता. मात्र उमेदवारांच्या प्रचाराने आयटीयन्सची डोकेदुखी वाढणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.