विदर्भात जाणाऱ्या सर्व एस.टी. बसेसचे आरक्षण फुल्ल

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जादा बसेस सोडण्याचे प्रशासनाचे नियोजन

पुणे – दिवाळी सणानिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एस.टी.) प्रवाशांना राज्यातील विविध ठिकाणी जाण्यासाठी आगाऊ आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. मात्र, सद्यस्थितीत पुणे विभागातून विदर्भातील नागपूर, अमरावती व अकोला या ठिकाणी जाणाऱ्या गाड्यांचे आगाऊ आरक्षण “हाऊसफुल्ल’ झाले आहे. मात्र, पुढील काही दिवसांत विदर्भात जादा गाड्यांची सोय केली जाणार असल्याचे, एस.टी. प्रशासनाने सांगितले आहे.

दिवाळीनिमित्त खानदेश, मराठवाडा, विदर्भ या भागांत जाण्यासाठी प्रशासनाने जादा बस नवीन शिवाजीनगर बसस्थानक (वाकडेवाडी), पिंपरी-चिंचवड व स्वारगेट या स्थानकातून सोडल्या जाणार आहेत. या कालावधीत दिवाळीला गावी जाण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे, दिवाळी आगोदर सार्वजनिक व खासगी वाहतूक व्यवस्थेवर ताण येत असल्याने प्रवाशांच्या सोईसाठी एस.टी. प्रशासनाने एक महिना आगोदर आगाऊ आरक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे.

आरक्षणासाठी प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असल्याने आसनसंख्या वाढविली जाणार आहे. तसेच, टप्याटप्याने जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. तसेच, प्रवाशांनी आगाऊ आरक्षण करण्याची सोय एस.टी.च्या अधिकृत खासगी आरक्षण केंद्रावरही उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच, दिवाळीपूर्वी जादा बसेसची सोय केली जाणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार नाही, असे एस.टी. प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.