मुंबई- अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच अनेक नवनवीन फोटोशुट करत असते. नवीन आणि हटके फोटोशुटसाठी ती प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र आता ती फोटोशुट दरम्यानच्या व्हीडियोमुळे चर्चेत आली आहे.
हे फोटोशूट करताना उर्वशीचा तोल गेला अन् ती खाली बसली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. उर्वशी पंजाबी रॅपर जस मानक याच्यासोबत फोटोशूट करत होती. हे फोटोशूट करताना तिने तब्बल 55 लाख रुपयांचा लेहंगा परिधान केला आहे.
हाच ड्रेस घालून तिने गायिका नेहा कक्करच्या लग्नात हजेरी लावली होती. हा महागडा पोषाख परिधान करुन ती मानकसोबत एका आराम खुर्चीवर बसून फोटो काढत होती. तेवढ्यात तिचा तोल गेला. हा व्हीडियो सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे.
दरम्यान, उर्वशीच्या या व्हीडियोवर तिच्या अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. सध्या ट्रोलींग प्रचंड प्रमाणात वाढलं असताना या व्हीडियोमुळे तिला चाहत्यांनी ट्रोल केलं नाही तर अवाक अशा प्रतिक्रिया दिल्य़ा आहे.
View this post on Instagram