Mrunmayee Deshpande : मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तिचे अनेक व्हिडिओ आणि फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. नुकतेच तिने केलेल्या फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. मृण्मयीने सुंदर साडीमधील फोटो शेअर केले आहेत.
मृण्मयीने पिवळ्या रंगाची पैठणी साडी परिधान केली आहे. पिवळ्या साडीवर मृण्मयीने जांभळ्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे. पैठणी साडीतील लूकवर मृण्मयीने सुंदर दागिन्यांचा साज केला आहे. यावेळी तिने एकापेक्षा एक सुंदर पोज देत चाहत्यांची मनं जिंकली आहेत. साडीतील फोटोंना मृण्मयीने #SareeLove #Festival असे हॅशटॅग दिले आहेत. या लुकमध्ये मृण्मयी फारच सुंदर दिसत असून तिच्या या फोटो लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे चाहत्यांसह अनेक अभिनेत्रींनी देखील कमेंट करत मृण्मयीचे कौतुक केले आहे.
View this post on Instagram
मृण्मयीने शेअर केलेल्या फोटोलाअभिनेत्री मिताली मयेकरने मृण्मयीच्या फोटोंवर ‘Uffff! Sundara!’ अशी कमेंट केली आहे. ‘Eyes Eyes Baby’ अशी कमेंट अभिनेत्री अमृता खानविलकरने मृण्मयीच्या फोटोंवर केली आहे. अभिनेत्री सुखदा खांडकेकरने ‘Ufff You…’ अशी कमेंट मृण्मयीच्या साडीतील फोटोंवर केली आहे. सध्या मृण्मयीचा पिवळ्या साडीतील लुक अनेकांच्या पसंतीस पडत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, नाटकांमधून आपल्या अभिनयाला सुरुवात केलेली मृण्मयी कुंकू, अग्निहोत्र अशा मालिकांमधून घराघरात पोहचली. ‘नटसम्राट’ स्लॅमबूक अशा दमदार चित्रपटांमध्ये काम करून तिने सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख बनवली आहे. यानंतर मृण्मयी चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी आणि अजय पूरकर अभिनीत दिग्पाल लांजेकर यांच्या ‘सुभेदार’ चित्रपटात पाहायला मिळाली होती.‘सुभेदार’ सह मृण्मयी देशपांडेने ‘शेर शिवराज’, ‘फर्जंद’ आणि फत्तेशिकस्त’ या चित्रपटात देखील तिने उत्तम भूमिका साकारली होती.