नवी दिल्ली -राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये मंगळवारी दिवसाढवळ्या तीन बदमाशांनी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे ( Karani sena ) अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी ( Sukhdev singh gogamedi ) यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि नंतर ते पळून गेले. करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.मात्र त्यानंतर सुखदेव सिंग यांच्या हत्येचा खळबळजनक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. ( murder of Karnisena president )
राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी यांच्यासह घटनेच्या वेळी उपस्थित असलेले गार्ड अजित सिंग यांनाही गोळ्या घालण्यात आल्या. अजित गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर जयपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, सुरक्षारक्षकांनी केलेल्या गोळीबारात एक हल्लेखोरही ठार झाला. गँगस्टर रोहित गोदाराने हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. ( Sukhdev singh murder cctv )
सुखदेव सिंग गोगामेडी कोण आहेत?
सुखदेव सिंग गोगामेडी हे राजस्थानातील राजपूतांचे नेते होते. राजपूतांमध्ये त्यांचा खूप आदर होता आणि ते तरुणांचा आवडते नेते होते. ते दीर्घकाळ राष्ट्रीय करणी सेनेशी संबंधित होते. पुढे करणी सेनेतील काही वादानंतर गोगामेडी यांनी राष्ट्रीय राजपूत करणी सेना या नावाने स्वतःची वेगळी संघटना स्थापन केली. तेव्हापासून ते या संस्थेचे अध्यक्ष होते.
सुखदेव सिंह गोगामेडी यांनी बसपकडून दोनदा निवडणूक लढवली होती. 2018 मध्ये गोगामेडी यांनी भाजपकडे तिकीट मागितले होते, मात्र भाजपने त्यांना तिकीट दिले नाही.
VIDEO | CCTV footage shows two men firing multiple shots at Rashtriya Rajput Karni Sena president Sukhdev Singh Gogamedi and another man standing at the door.
Gogamedi died, while one of his security personnel and another person were injured in the firing.
(Disclaimer: PTI… pic.twitter.com/2W4TQely7C
— Press Trust of India (@PTI_News) December 5, 2023
भन्साळी यांना कानाखाली मारली
सुखदेव सिंग गोगामेडी हे पहिल्यांदा देशात प्रकाशझोतात आले जेव्हा त्यांनी बॉलिवूड चित्रपट पद्मावतच्या शूटिंगदरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना कानाखाली मारली होती.2017 मध्ये जयगडमध्ये पद्मावती चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. तेव्हा गोगामेडी यांनी पद्मावती चित्रपटाला कडाडून विरोध केला होता. यावेळी चित्रपटाला विरोध करत राजपूत करणी सेनेच्या सदस्यांनी सेटची तोडफोड केली आणि भन्साळींवरही हल्ला करण्यात आला. अखेर निर्मात्यांनी चित्रपटाचे नाव बदलून पद्मावत केले.