मॉस्को – रशियाच्या एका प्रवासी विमानाचे टेक ऑफ करताच दोन्ही इंजिनमध्ये पक्षी घुसल्याने आपत्कालीन लँडिंग करावी लागली. या विमानात २२६ प्रवासी होते.
मॉस्कोच्या जुकोवस्की विमानतळावरून उरल एयरलाईन्सचे ए३२१ हे प्रवासी विमानाने २२६ प्रवासी आणि सात क्रू मेंबर यांना घेऊन उड्डाण केले. त्याचवेळी विमानाच्या दोन्ही इंजिनमध्ये पक्षी घुसले. आणि विमानाचे इंजिन बंद पडले. यामुळे विमानाचे लँडिंग गिअरही बंद झाले. परंतु, पायलटने अत्यंत चाणाक्षपणे विमान एका शेतात सुरक्षित उतरवले.
दरम्यान, या घटनेत २३ प्रवासी जखमी झाले असून यामध्ये नऊ बालकांचा समावेश आहे, अशी माहिती रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने दिली.
#Russia: A-321 of Ural airlines crashlanded near Zhukovskiy of Moscow region after bird strike. 10 wounded. Piliots managed to land a plane in the field https://t.co/r2XoFs37Wt pic.twitter.com/JHRpOOtH9g
— Liveuamap (@Liveuamap) August 15, 2019