#video : फारूक अब्दुल्ला कॅप्टर अमरिंदर सिंग यांच्यासोबत जुन्या गाण्यांवर थिरकले ;व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला हे नेहमी त्यांच्या आपल्या कडक शब्दातील राजकीय वक्तव्यांसाठी चर्चेत असतात. मात्र नुकतेच दिल्लीमध्ये त्यांचे वेगळेच रुप पाहायला मिळाले. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टर अमरिंदर सिंग यांच्या नातीच्या लग्नामध्ये अब्दुल्ला हे जुन्या चित्रपटांमधील गाण्यांवर ठेका धरताना दिसले.

अब्दुल्ला हे स्वत:च नाचले असे नाही तर त्यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनाही नाचवले. दोन्ही नेत्यांनी शम्मी कपूर यांच्या एका चित्रपटातील गाण्यावर डान्स केला. ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर’,‘गुलाबी आंखें जो तेरी देखी’ या गाण्यांवर दोघेही नाचले. फारूक यांच्या डान्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मागील आठवड्यामध्ये कॅप्टन यांची नात सहरइंदर कौर हिचा विवाहसोहळा दिल्लीत पार पडला. या विवाह सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीमध्ये अनेक मोठ्या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. व्हिडीओमध्ये आधी फारूख अब्दुल्ला यांनी ‘गुलाबी आंखें जो तेरी देखी’ या गाण्यावर डान्स केला. त्यानंतर ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर’ गाणं लागल्यानंतर फारूख यांनी कॅप्टन अमरिंदर यांना नाचण्यासाठी खेचून आणले. या व्हिडीओमध्ये फारूख यांच्यासोबत इतर काही लोकंही नाचताना दिसत आहेत.

फारूख अब्दुल्ला यांच्यावर अनेक शस्त्रक्रीया झाल्या आहेत. त्यांचे वयही खूप आहे असे असतानाही त्यांनी अगदी उत्साहामध्ये अमरिंदर सिंग यांच्या नातीच्या लग्नात डान्स केल्याचे पाहायला मिळाले. अनेकजण त्यांच्या या डान्सवर फिदा झाले. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही फारूख यांच्यासोबत डान्स करण्यासाठी कुटुंबातील काही लोकांना डान्स करण्यासाठी बोलवले. तसेच टाळ्या वाजवून अमरिंदर यांना अब्दुल्ला यांच्या डान्सचे कौतुकही केले.

व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर हजारोंच्या संख्येने शेअर झाला आहे. काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाचे नेते सरल पटेल यांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे. “फारूख अब्दुल्ला आणि कॅप्टन अमरिंदर सिग यांनी सिद्ध करुन दाखवलं की वय हे केवळ आकडा असतं,” असे ट्विट पटेल यांनी केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.