नवी दिल्ली : नोएडाच्या रस्त्यावर रात्री उशिरा एक 19 वर्षांचा मुलगा बिनधास्त धावत होता. घामाने लथपथ होता, पण त्याच्या चेहऱ्यावर किंचीतही थकावट दिसत नव्हती. उलट हसऱ्या चेहऱ्याने तो धावत होता. त्याला पाहून कारने जात असलेले चित्रपट निर्माते विनोद कापरी यांनी ताबडतोब त्याला कारने घरी सोडण्याची ऑफर दिली. परंतु, त्याने ती नाकारत आपलं धावणं कायम ठेवलं. प्रदीप मेहरा असं त्या तरुणाचं नाव आहे.
प्रदीप मेहरा मॅकडोनाल्ड कंपनीत नोकरी पूर्ण केल्यानंतर धावण्याचा सराव करतो. प्रदीपचं भारतीय सैन्यात भरती होण्याचं स्वप्न आहे. त्यासाठी तो काम संपल्यानंतर 10 किमी धावत जावून घर गाठतो.
एवढच नाही तर तो घरी जाऊन स्वतःसाठी आणि मोठ्या भावासाठी जेवण बनवतो. खुद्द प्रदीपनेच निर्माते कापरी यांना ही माहिती दिली. त्यावेळी कापरी यांनी त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला.
उत्तराखंडचा रहिवासी असलेला प्रदीप त्याच्या मोठ्या भावासोबत नोएडा येथे राहतो. त्याची आई रुग्णालयात दाखल आहे. प्रदीपचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर लगेच व्हायरल झाला असून नेटकरी प्रदीपच्या जिद्दीचं कौतुक करत आहेत.
This is PURE GOLD❤️❤️
नोएडा की सड़क पर कल रात 12 बजे मुझे ये लड़का कंधे पर बैग टांगें बहुत तेज़ दौड़ता नज़र आया
मैंने सोचा
किसी परेशानी में होगा , लिफ़्ट देनी चाहिएबार बार लिफ़्ट का ऑफ़र किया पर इसने मना कर दिया
वजह सुनेंगे तो आपको इस बच्चे से प्यार हो जाएगा ❤️😊 pic.twitter.com/kjBcLS5CQu
— Vinod Kapri (@vinodkapri) March 20, 2022
प्रदीपने सांगितले की, मला भारतीय सैन्यात भरती व्हायचंय. इतर वेळी आपल्याला सरावासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे नोकरी केल्यानंतर आपण धावत घरी जातो. दरम्यान कापरी यांनी प्रदीपला कारमध्ये बसण्याची ऑफर देत सकाळी लवकर उठून धावण्यासही सांगितलं. परंतु त्याने नम्रपणे त्यास नकार दिला.