Video : महिला पत्रकार ‘लाईव्ह’ करत असताना झाला रॉकेट हल्ला अन्…

नवी दिल्ली – संपूर्ण जग करोनाविरुद्धची लढाई लढत आहे. अनेक देशांमध्ये करोनाने थैमान घातलं आहे. मात्र दुसरीकडे इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील वाद चिघळला आहे. दोन्ही देशांकडून युद्ध पुकारण्यात आलं असून एकमेकांवर रॉकेट हल्ले सुरू आहेत. यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागत आहे. अशा स्थितीतही पत्रकार आपला जीव धोक्यात घालून येथील स्थितीचं रिपोर्टींग करत आहेत. मात्र एका महिला पत्रकाराला लाईव्ह रिपोर्टींग करत असताना विचित्र अनुभव आला असून हे कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

इस्त्राईलने केलेला रॉकेट हल्ला ‘अल जजीरा’ या वृत्तवाहिनीच्या कैमरेत कैद झाला आहे. विशेष म्हणजे ‘अल जजीरा’ची महिला पत्रकार लाईव्ह रिपोर्टिंग करत असताना हा हल्ला झाला. पत्रकार महिला गाझा आणि इस्त्राईलमध्ये चिघळलेल्या संघर्षाचे लाईव्ह वृत्तांकन करीत होती. त्यासाठी ती एका इमारतीच्या गच्चीववरून लाईव्ह रिपोर्टिंग करीत होती.

याचदरम्यान या भागातील बहुमजली इमारतीवर इस्त्राईलकडून हवाई हल्ला झाला. तिच्या डोळ्यादेखत समोरच्याच इमारतीवर झालेल्या हल्ला झाला. मोठ्या प्रमाणात धुर झाला होता. या हवाई हल्ल्यामुळं क्षणभर महिला पत्रकार हादरून गेली होती. त्या महिला पत्रकाराचे हावभाव कॅमेऱ्यात कैद झाले. या संदर्भातील व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.