पुणे : मुठा नदीपात्रात सोडण्यात आलेल्या 27 हजार क्यूसेक पाण्याच्या निसर्गाने सिंहगड रस्ता परिसरातील सोसायटीच्या परिसराच्या जवळ पाणी आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी आणि स्थानिक नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी या भागात पाहणी केली असून नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 11 वाजता हे पाणी सोडले असून हे पाणी एकता नगरी येथील द्वारका सोसायटीच्या परिसराजवळ पोहचले आहे.