पुणेकरांचे लक्ष वेधून घेतेय चार चाकी ‘क्‍यूट’ रिक्षा

पुणे – आता तीन चाकी ऐवजी पुण्यात चार चाकी रिक्षा धावताना दिसत आहे. राज्याच्या परिवहन विभागाने बजाजच्या क्‍यूट कारला रिक्षा म्हणून मान्यता दिली आहे. मुंबई, ठाणे परिसराबरोबरच आता या चारचाकी रिक्षा पुण्याच्या रस्त्यावर धावताना नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. रिक्षाच्या भाडेदरातच प्रवाशांना चारचाकीमध्ये बसल्याचा आनंद घेता येणार आहे.

बजाजने सार्वजनिक वाहतुकीसाठी आपली क्‍यूट कार लॉंच केली आहे. या क्‍यूट कारला सार्वजनिक वाहन सेवा म्हणून परिवहन विभागाने मान्यता दिली आहे. सध्या तीन चाकी ऑटो रिक्षांना असणारे प्रवास भाडे व इतर अटी, शर्ती या नव्या क्‍यूट रिक्षांना लागू होणार आहे. सध्या असणाऱ्या तीन चाकी रिक्षा या बजाज व टीव्हीएस कंपनीच्या आहेत. सुरुवातीला या रिक्षा जुलै महिन्यात मुंबई आणि ठाण्यात दाखल झाल्या होत्या. त्यापाठोपाठ आता पुण्यातूनही मागणी झाल्याने या रिक्षा आता कंपनीने पुण्यातही विक्रीसाठी उपलब्ध करूनह दिल्या आहेत. पुण्यात सात तर पिंपरीत पाच अशा एकूण 12 क्‍युट रिक्षा रस्त्यावर धावत आहेत.

क्‍यूट कार ही पेट्रोल, सीएनजी आणि एलपीजी या तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या वाहनाची आसन क्षमता, प्रति किलोमीटरसाठी होणारा इंधनाचा वापर, इंजिन क्षमता ही ऑटोरिक्षाच्या समकक्ष आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.