मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा वादग्रस्त पती ‘राज कुंद्रा’ याला पोर्नोग्राफी केसप्रकरणी काही दिवस तुरुंगाची हवा खावी लागली होती. पॉर्न व्हिडिओ बनविल्याप्रकरणी राज कुंद्रावर ही करावी करण्यात आली होती. सध्या राज जामिनावर बाहेर असून, तो सोशल मीडिया पासूनच लांबच राहत आहे.
राज कुंद्रा जेव्हा-जेव्हा सार्वजनिक ठिकाणी जातो तेव्हा तो स्वतःचा चेहरा झाकतो. आपला चेहरा झाकला जाईल, असे अतरंगी कपडे परिधान करून राज कुंद्रा घरातून निघतो. कधी राज संपूर्ण चेहरा झाकला जाईल असा मास्क आणि डोळ्यांवर मोठा गॉगल घालून दिसतो. की त्याचा हा अवतार पाहून शिल्पा शेट्टीला देखील हसू आवरलं नव्हतं.
दरम्यान, पुन्हा एकदा राज कुंद्राच्या अश्याच अतरंगी ड्रेसची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे. याचा एक व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल झाला आहे. राज कुंद्राला या लूकमध्ये कुणालाच ओळखता आलं नाही. त्यानं निळ्या रंगाचं जॅकेट घातलं होतं.
View this post on Instagram
त्यावर वेगळा असा मास्क त्यानं लावला होता. ते पाहून असं वाटतं की त्याला आतूनचा काळा चश्मा लावला आहे आणि श्वास घेण्यासाठी ओठांच्यावर थोडी जागा ठेवली आहे. तो मधमाशीसारखा दिसत आहे, अशाही कमेंट आल्या. त्याचा हा व्हिडिओ मुंबई विमानतळावरील आहे.