नवी दिल्ली – बॉलिवूड अभिनेत्री ‘स्वरा भास्कर’ आपल्या रोखठोक बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री सतत सोशल मीडियावर बेधडक वक्तव्य करत कधी कौतुक तर कधी टीकेला सामोरं जाते. काही दिवसांपूर्वीच स्वरा भास्कर हिने आपल्या बॉयफ्रेंड आणि राजकीय नेता असणाऱ्या फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज आणि साखरपुडा केला आहे. स्वतः स्वराने तिच्या कोर्ट मॅरेजचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. या दोघांचे धर्म वेगवेगळे आहेत. फहाद मुस्लीम तर स्वरा हिंदू आहे.
दरम्यान, कोर्ट मॅरेज केल्यानंतर अभिनेत्रीनं अगदी पारंपरिक हिंदू पद्धतीनं लग्न केलं आहे. तसेच, तिने आपल्या लग्नाचे खास रिसेप्शन सुद्धा आयोजित केलं होतं. तिच्या निकटवर्तीयांसाठी हे खास रिसेप्शन आयोजित करण्यात आलं असून, या रिसेप्शनला काँग्रेस प्रमुख राहुल गांधी यांनी देखील हजेरी लावल्याचं दिसून आलं आहे. या कार्यक्रमातील त्यांचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.
या व्हिडिओत राहुल गांधी यांची स्वरा भास्करच्या वेडिंग रिसेप्शनला ग्रँड एंट्री झाली. राहुल गांधी त्यांच्या नेहमीच्या पांढऱ्या सदऱ्यात रिसेप्शनला उपस्थित होते. रिसेप्शनमध्ये राहुल गांधी यांचा खेळकर स्वभाव दिसून आला. उपस्थित पाहुण्यांशी राहुल गांधी यांनी संवाद साधला.
View this post on Instagram
स्वरा भास्करचा ‘भारत जोडो यात्रे’मध्ये सहभाग…
काही महिन्यांपूर्वी राहुल गांधींच्या नेतृत्वात ‘भारत जोडो यात्रे’चे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेदरम्यान राहुल गांधी ज्या प्रदेशात जातात तेथील संस्कृती आणि भाषेत मिसळण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. बॉलिवूड अभिनेत्री ‘स्वरा भास्कर’ हिने देखील राहुल गांधींच्या या यात्रेत सहभाग घेतला होता.
यादरम्यानचे सोशल मीडियावर राहुल गांधी आणि स्वरा भास्करचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळाल. स्वरा भास्कर तिच्या स्पष्टवक्ते शैलीसाठी प्रसिद्ध आहे. अनेकदा तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तिचे नाव चर्चेत असते.