नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या एका चिमुकलीच्या गाण्याची भुरळ पडली असल्याचे आहे. कारण त्यांनी या लहानग्या मुलीचा व्हिडिओ त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. तिचे गायन आणि वादन ऐकून तुम्हालाही समाधान वाटल्याशिवाय राहणार नाही.
पंतप्रधान मोदींनाही या चिमुकलीच्या सुमधुर गाण्याने भारावून गेले आहेत. त्यांनी आपल्या अधिकृत ट्वीटरवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ आपल्या चेहऱ्यावर हसू आणेल असं यामध्ये लिहिलं आहे. शाल्मली असे या चिमुकलीचे नाव असून पंतप्रधान मोदींनी तिच्या गायनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Listened to this so many times..What an inborn talent..🌹🌹
Source:Wa . pic.twitter.com/bm1LEY4Nn4— Ananth Kumar (@anantkkumar) April 19, 2023
या व्हिडिओतील चिमुलकलीचे गायन अनेक नेटकऱ्यांना आवडले असून अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. दरम्यान, व्हिडिओतील चिमुकली तिच्या आईसोबत कन्नड भाषेतील एक कवितेचे गायन करत आहे.
प्रसिद्ध कवी के. एस. नृसिंह स्वामी यांनी ही कविता लिहिली असून पल्लवागाला पल्लवीयाली असे या कवितेचे नाव असून हे गाणे दक्षिणेतील प्रसिद्ध गाणे असल्याचे म्हटले जात आहे.