नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस अजेंड्यात दूरसंवादाद्वारे विशेष भाषण दिले. या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी अनेक मुद्दे उपस्थित केले. आर्थिक वाढ कायम राखतानाच भारत संपूर्ण खबरदारीसह करोनाच्या आणखी एका लाटेशी लढा देत आहे, असे मोदींनी यावेळीस जगभरातील देशांना सांगितले.
आपल्या भाषणांसाठी ओळखले जाणारे पंतप्रधान मोदी या भाषणामधूनही छाप पाडून गेले. मात्र त्यांचा भाषणापेक्षा जास्त चर्चा सुरु आहे ती म्हणजे या भाषणादरम्यान बंद पडलेल्या टेलिप्रॉम्टरची आणि त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या उडालेल्या गोंधळाची.
Jokes apart, but the person holding topmost chair in the country, couldn’t even utter a single word as soon as the #Teleprompter went off. This is when oratory skills were considered his biggest forte.
Goes on to show how the whole country was fooled.#TeleprompterPM pic.twitter.com/CUvHeUaQUN
— Mayank Saxena (@mayank_sxn) January 17, 2022
भारतीयांनी करोनाविरुद्ध लढा कसा दिला यासंदर्भात बोलताना भारतीयांची इच्छाशक्ती चांगली आहे, असे मोदी म्हणाले. मात्र त्यानंतर टेलिप्रॉम्टरमध्ये काहीतरी तांत्रिक अडचण आली आणि तो बंद झाला. यानंतर पंतप्रधान मोदी भाषण देता देता थांबले. ते गोंधळून आणि थोड्या संतापलेल्या हावभावासहीत स्क्रीनच्या उजवीकडे पाहू लागले. नंतर त्यांनी निराश होऊन हात वर करत अखेर कानात हेडफोन लावत आपल्या भाषणामध्ये झालेल्या गोंधळानंतर समोरच्यांना ऐकू येतंय का हे विचारु लागले.
या साऱ्या प्रकारामध्ये पंतप्रधान मोदी चांगलेच गोंधळलेले दिसले. टेलिप्रॉम्टर बंद झाल्यानंतर पंतप्रधानांना न अडखळता एक वाक्यही बोलता आलं नसल्याची टीका सोशल मीडियावरुन होऊ लागलीय. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुनही ‘हमें तो टेलीप्रॉम्प्टर ने लूटा, अपनों में कहां दम था।’, म्हणत मोदींवर निशाणा साधलाय. काँग्रेसने हे ट्विट करताना #TeleprompterPM हा हॅशटॅग वापरला आहे.