नवी दिल्ली – चीनमध्ये उगम पावलेल्या कोरोना विषाणूने अवघ्या जगाला वेठीस धरलं आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र कोरोनावर इतक्यात नियंत्रण मिळवता येईल अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाहीये. अशातच आता दिल्लीकरांचे टेन्शन वाढवणारी नवी माहिती समोर आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसोबत झुंजत असलेल्या दिल्लीकरांपुढे आता वायू प्रदूषणाचा प्रश्न उभा आहे. राजधानीत नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून थंडी वाढली असून सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे. थंडीसोबतच वातावरणातील प्रदूषकांचे प्रमाण देखील कमालीचे वाढले आहे.
#WATCH Delhi: Air quality deteriorates in the national capital with the rise of pollutants in the atmosphere.
Visuals from Waziradab area that is witnessing poor visibility today. pic.twitter.com/vVCDjhFgdg
— ANI (@ANI) November 5, 2020
दिल्लीतील प्रदूषणाची पातळी दाखवणारा एक व्हिडिओ ANI या नामांकित वृत्तसंस्थेने जारी केला आहे. हा व्हिडीओ दिल्लीतील वरीजादाब परिसरातील असून येथे प्रदूषणाच्या उच्च पातळीमुळे पाहण्यास देखील त्रास होतोय.