न्युयॉर्क – डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बिडेन यांनी या पुर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पडलेल्या मतांचा विक्रम मोडला. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या नावे यापुर्वी हा विक्रम होता. बिडेन यांना चार नोव्हेंबर रोजी सात कोटी सात लाख मते मिळाली.
एवढी मते यापुर्वी कोणत्याही उमेदवाराला मिळाली नव्हती. बराक ओबामा यांना 2008 मध्ये मिळालेल्या मतांपेक्षा ही संख्या तीन लाखांनी आधिक आहे. ओबामा यांना 2008मध्ये सहा कोटी 74 लाख 98 हजार 516 मते मिळाली होती.
राष्ट्राध्यक्ष पदाच्या लढतीत बिडेन यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा 27 लाख मतांनी आघाडी गेतल अिाहे. महत्वाच्या राज्यातही बिडेन यांन अधिक मते मिळाली आहेत. अद्याप पूर्ण मतमोजणी व्हायची आहे. कॅलिफोर्नियात अद्याप 64 टक्केच मतमोजणी झाली आहे. अद्याप दोन कोटी 30 लाख मतांची मोजणी व्हायची असल्याने लढतीतील चुरस अद्याप कायम आहे.