मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला ठरलेलाच न्हवता- मुख्यमंत्री

मुंबई- नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १४ दिवस उठल्यानंतर अखेर आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे.

दरम्यान, राजीना दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकरांशी संवाद साधला. आताच राज्यपालांना भेटून राजीनामा सादर केला, आणि त्यांनी तो स्वीकारला. राज्यातील मुख्यमंत्री पदावर बोलतानताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अडीच-अडीच वर्षे हा फॉर्म्युला ठरलेलाच नाही, हे मी आजही सांगतो आहे. अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर आमची बोलणी फिस्कटली होती त्यानंतरच्या माझ्यासमोरच्या एकाही चर्चेत हा विषय झाला नाही. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

तसेच, उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात जर विषय झालेला असेल तर मला माहित नव्हतं. मी तसं अमित शाह आणि नितीन गडकरी यांना विचारलं मात्र त्यांनीही असं काहीही ठरलेलं नाही असं सांगितलं. असं देखील ते म्हणाले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×