मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही फॅशन आणि स्टाईलची आयकॉन मानली जाते. 49 वर्षांची असूनही मलायकाने स्वतःला खूपच फिट ठेवले आहे. मलायका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते त्यामुळे दिवसेंदिवस तिचे फॅन्स देखील वाढत चालले आहेत.
अभिनेत्री नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे बोल्ड आणि मादक फोटो शेअर करत असते. तिचे हे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत. फॅन्स देखील या ग्लॅमर्स फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, 49 वर्षांची ही अभिनेत्री अजूनही 24 वर्षांच्या मुलींपेक्षा सुंदर दिसते. म्हणूच सोशल मीडियावर अभिनेत्रीचा स्वतःचा असा मोठा चाहता वर्ग आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या मालयकाचा एक जुना व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये मलायका अरोराने दमदार असा डान्स केला आहे. हॉट मूव्ह्स करताना देखील मलायका अरोरा दिसत आहे. काळ्या रंगाच्या साडीवर मलायका अरोरा हिचा अत्यंत बोल्ड लूक फॅन्सला अक्षरशः घायाळ करत आहे.
या व्हिडिओत अभिनेत्री “राम चाहे लीला चाहे राम…’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या गाण्यावर मालयकाने अतिशय हॉट मूव्ह्स केल्या आहेत. जे पाहून तुम्हाला देखील घाम फुटेल. काळ्या रंगाच्या साडीत ती अतिशय मादक दिसत असून, तिच्या अंदाजाने या गाण्याला चार चांद लावले आहेत. दरम्यान, व्हायरल झालेला हा व्हिडिओ एका डान्स रियालिटी शो मधील असल्याचं सांगण्यात येत आहे.