पणजी : गेल्या २० वर्षांहून अधिक काळ विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास हजेरी लावणारे चित्रपट समीक्षक डॉ. अनमोल कोठाडिया यांच्या सोबत डिजिटल प्रभात’ने केलेली खास बातचीत या व्हिडिओतून तुम्हाला पाहायला मिळेल. मूळचे कोलहापूरचे असलेले कोठाडिया सर दरवर्षी नित्यनेमाने संपूर्ण इफ्फीमध्ये चित्रपटांची समीक्षा करतात. त्याबाबत विविध माध्यमांमध्ये लेखन करतात.
इफ्फी चे नेमके महत्व डॉ. अनमोल कोठाडिया यांनी सांगितले आहे. शिवाय पत्रकारिता आणि माध्यमांच्या विद्यार्थ्यांनी इफ्फी ला नक्की यावे असेही त्यांनी सांगितले आहे. माध्यमांच्या विद्यार्थ्यांना आणि फिल्म स्कूल मधील विद्यार्थ्यांसाठी इफ्फी ही नवनवीन गोष्टी शिकण्यासाठीची नक्कीच एक चांगली संधी आहे.