छञपती संभाजीनगर – मेहनत करण्याची तयारी असेलतर कितीही मोठ्या संकटावर यश संपादन करता येते.असेच काहीसे स्वप्न छत्रपती संभाजीनगर शहरातील सूलीभंजन या छोट्याश्या गावातील कोमल कचरू जाधव या शेतकऱ्याच्या मुलींनी पोलिसाची वर्दी आपल्या अंगावर चढवण्याचे ध्येय निश्चे केलं होते. आणि आज अखेर तिनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात आलेल्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात स्पोर्ट कोट्यातून पोलीस उपनिरीक्षक या पदाला गवसणी घातली आहे.पी एस आय झाल्याचे समजताच मामाच्या घरून तर गावातूनही डी.जे लावून जंगी मिरवणूकही काढण्यात आली.
शिक्षणाची व्यवस्था नसल्याने गावा सोडून –
कोमलचे मूळ गाव खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन या छोट्या गावात तिचा जन्म झाला मात्र,गावात शिक्षणाची व्यवस्था नसल्याने छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर येथे आजी – आजोबा, मामाकडे पुढील शिक्षणासाठी आली. शहरातील ज्ञानांकुर शाळेत पाहिलं ते दहावीचं शिक्षण पूर्ण केलं तसेच अकरावी –बारावी आणित्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण शहरातील छत्रपती शिवाजी कॉलेजमधून पूर्ण केलं.
कोमल जाधव हिचं वडील शेतकरी मात्र,शेती कमी असल्याने मोलमजुरी करतात तर आई अंगणवाडी सेविका आहे. जाधव यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. परिवारात कोमल ही सर्वात मोठी मुलगी कोमल अभ्यासात सर्वसाधारण असली तरी अभ्यासाची गोडी मात्र काही कमी नव्हती.शालेय जीवनातच अभ्यास बरोबरच खेळाची आवड निर्माण झाली होती.
कोमल ही नॅशनल लेवल तलवारबाजी खेळाडू आहे, तलवारबाजी या खेळात तिने नववीत असतानाच नॅशनल स्पर्धेत (ब्राँझ) कांस्यपदक मिळवलं आहे.तेंव्हा शाळेत स्नेहसंमेलन व सत्काराचा कार्यक्रमानिमित्ताने. त्यावेळेस तत्कालीन पोलीस आयुक्त संदीप भाजीभाकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होती.
त्यावेळी त्यांनी घातलेली वर्दी पाहून मी पण मोठ्यापणी अशीच वर्दी अंगावर चढवून शाळेत मार्गदर्शन करण्याचं मनाशी पक्कं केलं. प्रमुख पाहुण्यांचे भाषण झाल्यावर त्यांच्याशी चर्चा केल्यावर स्पोर्ट कोट्यातून आरक्षण मिळत असते.ही माहिती मला त्यावेळीस् मिळाली म्हणून मी खेळात सातत्य ठेवले.
आणि बारावी झाल्यापासून पोलीस भरतीची तयारी सुरू केलं. तीन – चार वर्ष तयारी करत होती,मात्र यश प्राप्त झाले नाही.म्हणून खचून न जात पुन्हा जोमाने तयारी केली आणि कोरोना काळात स्टप्फ सिलेक्शन परिक्षा मधून BSF पदी निवड झाली होती.मात्र, कोरोना काळात निकाल उशिरा प्राप्त झाला होता.
त्यावेळेस मी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली त्यामुळं BSF हे पद सोडून मी “पी एस आय” पद निवडलं या काळात गावातले लोक आई वडिलांना सातत्याने म्हणत कुठे BSF परीक्षा पास झाली हे काहीपण सांगता त्यावेळी मी निश्चय केला की,आत्ता गावात पोलिसाची वर्दी घालूनच जाणार आणि पी एस आय या पदी माझी निवड झाल्यावर गावात गेली.तेव्हा झालेला आनंद मी व्यक्त करू शकत नाही,असे कोमलने सांगितलं.
शेतीवर घराचं प्रपंच चालत नसल्याने वडील शेती सोबतच मोलमजूर म्हणून काम करत.त्यामुळे घरची परिस्थिती तशी नाजूक होती. यामुळं स्पर्धा परीक्षांचे क्लासेस करण्यासाठी पैसे नसल्याने तीन महिन्यात क्लास पैसे अभावी सोडावे लागले.एमपीएससी च्या तयारीसाठी पुस्तक घेणं शक्य नव्हतं,पुस्तकाची किंमत जास्त असल्याने पुस्तक घेण्यासाठी वडिलांकडे पैसे मागू की नको असे वाटयच.
कारण,की घरची परिस्थिती बेताची होती. त्यातच नंतर माझा नंबर बार्टीमध्ये लागलं त्यात मिळालेल्या स्कॉलरशिप व पुस्तकावर पुढचा अभ्यास करत हे यश संपादन केलं पोलीस उपनिरीक्षक या पदावर समाधान न मानता भविष्यात राज्य सेवाची परीक्षा देऊन dysp होण्याचं स्वप्न आहे,त्या दृष्टीने माझी तयारी सुरू राहील आणि त्यासोबतच शिक्षण ही सुरू ठेवणार असून, MA ची पदवीही घेणार असल्याचे कोमल जाधव हिने प्रतिक्रिया देताना सांगितले.
मंगला जाधव कोमलच्या आई…
माझे शिक्षण बारावी पर्यंत झाले आहे,त्यामुळं मला ही अंगणवाडी सेविकाची नौकरी लागली होती.त्यामुळं मला वाटे की,माझी मुलगी शिकून मोठी अधिकारी झाली पाहिजे.आणि आज माझी मुलगी PSI झाली खूप खूप छान वाटते आणि तिचा अभिमान वाटतो असे कोमलची आई मंगला जाधव यांनी सांगितलं…
कोमलचे वडील कचरू जाधव…
कोमलचा ज्यावेळेस psi झाल्याचा फोन आला तेव्हा मी,शेतात आद्रक लावत होता,त्यावेळेस डोळ्यातून आनंदाश्रू तरळले घर जाऊन ही बातमी सांगितली आणि काय करू काय नको हे सुचत नव्हेत.छत्रपती संभाजीनगर शहरात छत्रपती कॉलेज मध्ये गाडी सांभाळण्याचे काम मिळाले तेंव्हा मी रोज जाऊन येऊन काम करत कॉलेजमधील मुलांनी आणि सरांना बघून माझी मुलगी या कॉलेजमध्ये शिकावं असे स्वप्न बघितल होते आणि त्याचं कॉलेज मध्ये तिची शिक्षण झाली.आणि आज पी एस आय झाली माझा आनंद मी शब्दात मांडू शकत नाही असे कोमलचे वडील कचरू जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केली.