मुंबई – ‘गौतमी पाटील’ हे नाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चांगलच चर्चेत आहे. त्यासोबत चर्चेत आहेत गौतमी पाटीलने केलेल्या डान्सचे व्हिडीओ आणि याच व्हिडीओमुळे आज गौतमी पाटील सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. डान्स दरम्यान केलेलं अंगविक्षेप यामुळे गौतमीचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून, नेटकरी देखील तिच्या या व्हिडिओवर जोरदार कमेंटचा वर्षाव करत असतात.
दरम्यान, आपल्या लावणीमुळे धुमाकूळ घालत संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी गौतमी पाटील हिची लोकप्रियता बघता गौतमीला पंजाबी म्युझिक व्हिडियोमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. नुकतंच या गाण्याचा ऑफिशल व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून, स्वतः गौतमी पाटीलने सुद्धा आपल्या नवीन पंजाबी गाण्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
‘तेरा पता…’ असे तिच्या या नवीन गाण्याचे नाव आहे. तिचे हे गाणे पंजाबी भाषेतील आहे. सध्या गौतमीच्या या पंजाबी गाण्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, तिच्या गाण्याला दोन दिवसांमध्ये तब्बल 13 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. मराठीत लोकप्रियता मिळवून आता गौतमी आपली जादू पंजाबी इंडस्ट्रीमध्ये दाखवण्यास सज्ज झाली आहे. गौतमीच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी हार्ट ईमोजी आणि कमेंट करत आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.