पुणे – लिटल कुमार चॅम्पियनशिप सिरिज टेनिस स्पर्धेत 12 वर्षाखालील गटात शौर्य घोडके, रोहन बजाज, त्रिशिक वाकलकर, काव्या देशमुख, श्रेया पठारे, सृष्टी सूर्यवंशी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.
या स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात दुसऱ्या फेरीत अव्वल मानांकित शौर्य घोडके याने सिद्धांत दर्डाचा 6-3 असा तर, रोहन बजाजने प्रज्ञेश शेळकेचा 6-4 असा पराभव केला. पृथ्वीराज दुधाणे व त्रिशिक वाकलकर यांनी अरहंत कवठेकर व राजवीर इंगवले यांचा 6-1 अशा फरकाने पराभव केला.
14 वर्षाखालील मुलींच्या गटात दुसऱ्या फेरीत देवांशी प्रभुदेसाईने अवंतिका सैनीचा 6-0 असा सहज पराभव केला. निशिता देसाईने आदिश्री जोशीवर 6-1 असा विजय मिळविला.